भाजपच्या अडचणी वाढणार कारण केजरीवाल मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | आपच्या रूपाने आता भाजपसमोर नवं आव्हान उभं राहणार असल्याचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे सध्या दिल्लीत लागलेले आपचे पोस्टर. यामध्ये राष्ट्रनिर्माणासाठी सहभागी व्हा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

राष्ट्र निर्माण म्हणजे येत्या काळात लोकसभा निवडणुकीत आप पक्ष नवा पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. पक्षाला देशभर बळकटी देण्याचं काम येत्या काही वर्षामध्ये होताना दिसेल.

दिल्लीत झालेल्या सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपला आस्मान दाखवलं आहे. यामुळे आता ‘आप’ला रोखण्याचं भाजपसमोर आव्हान असणार आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला अवघ्य 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यावेळी भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-लोकसंख्या नियंत्रणसाठी शिवसेनेचा पुढाकार; राज्यसभेत केलं विधेयक सादर

-“दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा बुडबुडा फुटला”

-वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?; ठाकरे सरकारचे संकेत

-महिलेला पळवून नेण्याचा आरोप असणाऱ्या महाराजांचा मोठा खुलासा

-ठाकरे सरकारमध्ये कोणाचाच कोणाला मेळ नाही ‘मजा’ चालली आहे नुस्ती- किरीट सोमय्या