“काँग्रेसनं केजरीवालांचं नेतृत्व स्वीकारावं”

नवी दिल्ली | काँग्रेसचे देशभरातील काही नेते अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व का स्विकारत नाही. सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाकडं इतकं काय चांगलं आहे, असा सवाल लेखक चेतन भगत यांनी केला आहे. दिल्ली निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा दिल्लीच्या मतदारांनी हद्दपार केलं. या दारूण पराभवानंतर काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. चेतन भगत यांनी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवा पर्याय सुचवला आहे.

कोणत्या पक्षामुळं तुमचं करिअर अधिक सुधारणार आहे. घसरत चाललेल्या की विस्तारात जाणाऱ्या? याचा विचार करा, असा सल्ला चेतन भगत यांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला अवघ्य 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यावेळी भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-भाजपच्या अडचणी आता वाढणार कारण अरविंद केजरीवाल उचलणार ‘हे’ पाऊल

-लोकसंख्या नियंत्रणसाठी शिवसेनेचा पुढाकार; राज्यसभेत केलं विधेयक सादर

-“दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा बुडबुडा फुटला”

-वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?; ठाकरे सरकारचे संकेत

-महिलेला पळवून नेण्याचा आरोप असणाऱ्या महाराजांचा मोठा खुलासा