महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करणारे आता दिल्लीला प्रचाराला आलेत- केजरीवाल

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळतंय. अशातच दिल्ली भाजपच्या मदतीला महाराष्ट्र भाजप देखील धावून गेलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करायला महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झालेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा प्रचाराला गेलेल्या विनोद तावडेंवर बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करणारे आता दिल्लीला प्रचाराला आले आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी तावडेंचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्या आहेत आणि आता हेच तावडे दिल्लीत प्रचाराला आले आहेत, असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं आहे.

आपण खूप मेहनत करून दिल्लीच्या शासकीय शाळांनाजपलंय आणि मोठं केलंय. प्रचारासाठी आलेल्या तावडेंना आपल्या शाळा दाखवा… छोले भटुरे खायला घाला कारण ते आपले पाहुणे आहेत, अशी उपरोधिक टीका देखील त्यांनी तावडेंवर केली आहे.

दरम्यान, केजरीवालांच्या टीकेला आता तावडे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणण्यामागे फडणवीस सरकारचाच हात- नवाब मलिक

-सलाईनच्या बाटलीत शेवाळ; सरकारचाच जर असा पुरवठा… तर रूग्णांनी काय करावं?

-तुकाराम मुंडेंनी पहिल्याच दिवशी भरला अधिकाऱ्यांना दम

-इतक्या भीषण थंडीत आंदोलनकर्त्यांपैकी कोणी मरत कसं नाही; भाजप नेत्याचं संतापजनक वक्तव्य

-“नरेंद्र मोदी देशासाठी दिवस रात्र मेहनत करतात म्हणून मी भाजपत प्रवेश केला”