नवरा देशासाठी शहीद झालाय आणि मुलीला शाळेत साधा प्रवेश मिळत; वीरपत्नीची खंत

नांदेड | माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले, अशी खंत नांदेडमधील वीरपत्नीने व्यक्त केली आहे. शीतल संभाजी कदम असं या वीरपत्नीचं नाव आहे.

शीतल यांचे पती काश्मीरमधील नागरौता येथे 29 नोव्हेंबर 2016 ला शहीद झाले होते. संभाजी यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि सहा वर्षाची तेजस्विनी ही मुलगी आहे. बेस कॅम्पसमध्ये असलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण संभाजी कदम यांच्यामुळे वाचले होते. संभाजी कदम मात्र शहीद झाले.

शीतल या त्यांच्या मुलीला शिकवून मोठी अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहात आहेत. त्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शहरातील ज्ञानमाता इंग्लिश स्कूलमध्ये त्या गेल्या होत्या. मात्र मागील वर्षी प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या वीरपत्नीला परत पाठवण्यात आलं. तसेच यंदाही तीच परिस्थिती आहे.

दरम्यान, शीतल यांनी शाळेची जी फी असेल ती भरू पण माझ्या मुलीला शाळेत प्रवेश द्या, असं म्हटलं. मात्र शीतल यांचं काहीही न ऐकता शाळेने त्यांच्या मुलीला प्रवेश दिला नाही त्याउलट अपमानास्पद वागणूक दिल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या- 

-भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणण्यामागे फडणवीस सरकारचाच हात- नवाब मलिक

-सलाईनच्या बाटलीत शेवाळ; सरकारचाच जर असा पुरवठा… तर रूग्णांनी काय करावं?

-तुकाराम मुंडेंनी पहिल्याच दिवशी भरला अधिकाऱ्यांना दम

-इतक्या भीषण थंडीत आंदोलनकर्त्यांपैकी कोणी मरत कसं नाही; भाजप नेत्याचं संतापजनक वक्तव्य

-“नरेंद्र मोदी देशासाठी दिवस रात्र मेहनत करतात म्हणून मी भाजपत प्रवेश केला”