‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्ली सरकारच्या मदतीसाठी आणखी 50 लाखांची मदत केली आहे.

दिल्ली सरकारने आपण केलेली मदत नाकारल्याचा आरोप गंभीरने केला आणि आता अतिरिक्त 50 लाखांची म्हणजे एकूण 1 कोटी रुपये खासदार निधीतून देण्याचं जाहीर केलं. गंभीरने केलेल्या आरोपाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी गौतम गंभीर यांनी देऊ केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीबाबत आभार मानले आहेत. आम्हाला पैशांची समस्या नाही आहे. तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची आवश्यकता आहे, असं म्हणत केजरीवालांनी गौतम गंभीरकडे पीपीई उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

गौतमजी तुमच्या प्रस्ताबाबद्दल धन्यवाद. मात्र पैशांची समस्या नाही आहे तर पीपीई किट्सची उपलब्धता ही मोठी समस्या आहे. तुम्ही तातडीने आम्हाला पीपीई किट्स उपलब्ध करुन दिल्यास आम्ही तुमचे आभारी राहू. दिल्ली सरकार त्या किट्स खरेदी करेल. धन्यवाद, असं ट्विट केजरीवालांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

-14 एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी- राजू शेट्टी

-धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…

-पुणेकरांची चिंता वाढली; नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

-सरकारचा मोठा निर्णय! खासदारांच्या वेतनात वर्षभरासाठी ‘इतक्या’ टक्क्यांची कपात