अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत… तसे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली |  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत. तसे पुरावे आमच्याकडे आहेत, असा खळबळजनक दावा केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

दिल्लीच्या जनतेला निरागस चेहरा करून केजरीवाल विचारत आहेत की मी दहशतवादी आहे का? होय तुम्ही दहशतवादी आहात… तुम्ही दहशतवादी असल्याचे खूप सारे पुरावे आमच्याकडे आहेत, असं जावडेकर म्हणाले आहेत. तुम्ही स्वत: म्हणाला होतात की मी अराजकवादी आहे. केजरीवालजी, अराजकवादी आणि दहशतवादी यामध्ये फारसा फरक नसतो, असंही ते म्हणाले आहेत.

दुसरीकडे जावडेकर यांच्या वक्तव्यानंतर आम आदमी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. अशी भाषा भाजप नेते कशी वापरू शकतात. या सगळ्यांविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं आपने सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपचा दिल्लीत होणारा पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसायला लागलाय त्यामुळेच भाजप नेते अशी वक्तव्य करत आहेत, असं आपने म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“ह्या डांबर चोरात किती हिम्मत आहे ते आम्हाला माहीतय, कुठे यायचं सांगा फक्त”

-…तर देश तुम्हाला माफ करणार नाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

-“मनसेच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावं”

-“मनसेच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावं”

-“शेलार, लक्षात ठेवा मी आधी शिवसैनिक आणि मग मंत्री आहे”