दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल

नवी दिल्ली | दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत दगडफेक आणि तुरळक जाळपोळ या घटना समोर आल्या आहेत.

जहांगीरपुरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सुरक्षेसाठी अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

जहांगीरपुरी गोंधळानंतर संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि गुन्हे शाखा या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणार आहे. यासाठी 10 पथकं तयार करण्यात आली आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे की, ‘दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निषेधार्ह असून दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी.’

महत्त्वाच्या बातम्या- 

लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती! 

कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…

IPL 2022: दिल्लीचा 16 धावांनी पराभव करत बंगळुरूचा ‘राॅयल’ विजय; DKची वादळी खेळी 

“रशिया-युक्रेनमुळे महागाई वाढली, मोदींनी तर…”, शेलारांचं वक्तव्य चर्चेत

दिल्लीत मोठा राडा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शांततेचं आवाहन