मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी या प्रकरणात थेट सरकारला तीन तारखेचा अल्टीमेटम दिला आहे.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर आता राज्यात भाजप आणि मनसे युती होण्याची शक्यता आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या प्रस्तावला आमचा विरोध आहे. भाजपमध्ये मनसेला येण्याची गरज नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या सभेत जितकी गर्दी होते तीच गर्दी निवडणुकीत कुठे जाते?, असा सवाल देखील रामदास आठवले यांनी उपस्थित केलाय.
राज ठाकरे यांनी इतरांचे भोंगे उतराण्याकडे लक्ष दिलं देऊ नको. त्यांना जिथे लावायचे आहेत तिथे त्यांनी लावावे, असंही आठवले म्हणाले आहेत.
बाळासाहेब यांची भूमिका कट्टर होती पण भोंगे उतरवा असं ते बोल न्हवते, असंही आठवलेंनी म्हटलंय. जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा, अशी कविता देखील त्यांनी यावेळी केलीये.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती व्हावी, असं वक्तव्य केली आहेत. त्यामुळे रामदास आठवलेंचा भाजप मनसे युतीला विरोध असल्याचं पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”
Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
अत्यंत धक्कादायक प्रकार समोर; घोरपडीवर सामूहिक बलात्कार
रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; रणबीरने घेतला मोठा निर्णय
आंबेडकर जयंतीनिमित्त ‘या’ ठिकाणी चक्क 1 रुपयात मिळतंय 1 लिटर पेट्रोल!