मुंबई | आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे. याच पाश्वभूमीवर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक-दोन नव्हे तर 14 ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी पक्षाचा संपूर्ण इतिहास आपण पाहिला तर जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यांचा कलम 370 ला विरोध होता, पण याबाबत राष्ट्रवादीने काय भूमिका घेतली होती, हे सर्वांना माहितीये, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
संविधानात आरक्षणाला विरोध असतानाही मुस्लीम आरक्षणासाठी सातत्यानं का शरद पवारांकडून पुढाकार घेतला जात होता?, असा प्रश्न देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, असं विघातक कृत्य आणि विचार बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताला मान्य नाही, असंही फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”
“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”
Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
अत्यंत धक्कादायक प्रकार समोर; घोरपडीवर सामूहिक बलात्कार
रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; रणबीरने घेतला मोठा नि