कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी सत्यजित तांबेंचं नाव नाकारल्यानं तांबेंचं सूचक वक्तव्य म्हणाले..

मुंबई| महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली.

आश्चर्याची बाब म्हणजे 12 जणांच्या या यादीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. वंचितकडून निवडणूक लढवणाऱ्या अनिरुद्ध वनकर यांच्या उमेद्वारीला विदर्भ काँग्रेसने विरोध केला आहे. तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवलेले वंचितचे उमेद्वार यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीत संधी दिल्याने त्यांचीही चर्चा सुरु आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आलेल्या नंदुरबारमधील चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लावली आहे. मात्र, वंचितच्या उमेद्वाराला संधी दिल्याने विदर्भ काँग्रेसमधील असंतोष जाहीरपणे समोर आला आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली.

विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचं नावं नाही. सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन ‘श्रद्धा और सबुरी’ असं ट्वीट केलं आहे.

या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होतो. तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.

सत्यजीत तांबे यांचे वडील हे नाशिक पदवीधर मतदार संघातून सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. यामुळे सत्यजित तांबे यांना काँग्रेसनं संधी दिल्यास बाप-लेक एकाच वेळी विधान परिषदेच्या बाकावर बसलेले पाहायला मिळू शकले असते.

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे महसूल मंत्रीही आहेत. मात्र, तरीही सत्यजित तांबे यांचं नाव 12 जणांच्या यादीत नाही. विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त नावं जाहीर होताच काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे.

सत्यजित तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम केलं आहे. तसंच जयहिंद युवा मंचाद्वारे तांबे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बो.ल्ड सीन शूट करताना मिथुनचा ताबा सुटला आणि त्याने माझ्यावर…; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर अभिषेकनं मौन सोडलं म्हणाला…

जॅकलीन फर्नांडीसचा मोठा खुलासा! म्हणाली सलमानने फार्म हाऊसवर माझ्या सोबत…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आणखी एका व्यक्तीला एनसीबीनं रंगेहात पकडलं

‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात