सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.

2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही? असं ट्वीट महेश तपासे यांनी केलं आहे.

मला प्रेम पत्र आल आहे. ते इनकम टॅक्सचे प्रेमपत्र आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इन्कम टॅक्सने नोटीस पाठवली आहे, असं शरद पवारांनीही सांगितलं आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ईडीसारख्या (ED) एजन्सीद्वारे महाराष्ट्रातील अनेक आमदारांची चौकशी सुरू आहे. ईडीचा उपयोग राजकीयदृष्या केला जात आहे.

इन्कम टॅक्स, ईडी व सीबीआयचा (CBI) राजकीय वापर चिंताजनक हा चिंताजनक आहे. वेगळ्या विचारांच्या व्यक्तींविरुद्ध ईडी या एजन्सीचा वापर होतो, असंही शरद पवार (sharad pawar) म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं तर…” 

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे- शरद पवार 

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री 

“देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं कठीण” 

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले…