शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर पडदा पडत असताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. तर एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होत असेल तर त्याचा आपल्याला आनंद आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने मुर्मूंना पाठिंबा जारी केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवसनेच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सूचक ट्विट केलं आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक वैचारिक लढाई असून लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष आहे. स्त्री, पुरूष किंवा आदिवासी बिगर आदिवासी अशी लढाई नाही. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते यशवंत सिन्हांना पाठिंबा देत आहेत, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे.

शिवसेना वेगळा राजकीय पक्ष असून ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र, गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले असताना शिवसेनेची ही भूमिका अनाकलनीय आहे, असं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी केलं आहे.

शिवसेना महाविकास आघाडीत आहे. पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, असं देखील बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेतून 40 आमदार बंड करून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असा शिवसेना खासदारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव होता. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील समीकरणात काही बदल दिसणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘काय तो दांडा आणि काय ते ढुं..’ म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या प्रवक्त्याही शिंदे गटात!

पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!

“विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचाय”

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा