“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत”

लखनऊ | एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये बोलत होते.

जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्यांप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील, असा इशारा असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

मी पंतप्रधान मोदी आणि भाजपला कृषी कायद्यासारखे सीएए मागे घेण्याचं आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसीवर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल, असं ओवैसी म्हणालेत.

पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचं काय झालं असतं. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते, अशी बोचरी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर केली आहे.

तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान म्हणाले होते की त्यांच्या ‘तपस्या’ मध्ये काही कमतरता होत्या. आपले पंतप्रधान किती मोठे अभिनेते आहेत हे यावरून कळतं, असं त्यांनी म्हटलंय.

खरी तपस्या शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनांमध्ये केली होती ज्यात सुमारे 750 शेतकरी मरण पावले, असं सांगत त्यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

अहो मोदीजी, तुम्ही स्वतःला हिरो बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तसेच आगामी निवडणुका पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काळे कायदे मागे घेतल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.

दरम्यान, दिल्लीतील शाहीन बाग हे सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचं केंद्र होतं. 2020 च्या सुरुवातीला कोविड -19 मुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनासाठी शेकडो महिलांनी अनेक महिने तळ ठोकलेल्या निषेध स्थळाची जागा रिकामी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-  

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘फोटोबॉम्ब’; वानखेडेंचं टेंशन वाढलं

पुण्यनगरीचे महापौर पुन्हा चर्चेत! ‘हा’ बहुमान मिळवणारे देशातील पहिले महापौर

 “चार दलितांना मंत्रिपदं देणं हा तर काॅंग्रेसचा दिखाऊपणा आणि भंपकपणा आहे”

 “या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसूलीचा कार्यक्रम”

गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला