नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘फोटोबॉम्ब’; वानखेडेंचं टेंशन वाढलं

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिकांनी एक ट्विट करत वानखेडेंवर फोटोबॉम्ब फोडला आहे.

नवाब मलिकांच्या या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडेंचा एक फोटो शेअर केला आहे.

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेंचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे’ कबूल है, कबूल है, कबूल है…. असं कॅप्शन देखील दिलं आहे.

मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी हा फोटो पोस्ट कोला आहे.

समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन तसेच ट्विट करत याबाबत अनेक पुरावे सादर केलेत.

आज पुन्हा नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या गदारोळावर भाष्य केलं होतं.

एखादा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला आहे. त्यामुळे एसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बाजू भक्कम आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

पाहा ट्विट-

 

महत्त्वाच्या बातम्या-  

पुण्यनगरीचे महापौर पुन्हा चर्चेत! ‘हा’ बहुमान मिळवणारे देशातील पहिले महापौर

 “चार दलितांना मंत्रिपदं देणं हा तर काॅंग्रेसचा दिखाऊपणा आणि भंपकपणा आहे”

 “या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसूलीचा कार्यक्रम”

गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला

 “उगाच माथी भडकाऊ नयेत, फडणवीसांनी थोडा संयम बाळगायला हवा”