मोदींनी आत्ताच राम मंदिर ट्रस्टची घोषणा का केली?; ओवैसींनी सांगितलं कारण

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अयोध्येतील राम मंदिराबाबत निवेदन दिलं. आता सरकारने घेतलेल्या एका योजनेमुळे या कामालाही वेग येणार आहे. केंद्रिय मंत्रिमंडळाने बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली आली आहे. मात्र राम मंदिर ट्रस्टची घोषणा मोदींनी आताच का केली याचं कारण सांगत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींना टोला लगावलाय.

असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींच्या घोषणा केलेल्या निवडण्यात आलेल्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिल्लीतील पराभवाच्या धसक्याने भाजपने राम मंदिर ट्रस्टची घोषणा केली आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 11 फेब्रुवारी रोजी संपत आहे. मग ही घोषणा 11 फेब्रुवारी रोजी करता आली असती. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीची भाजपला चिंता आहे आणि याच चिंतेतून भाजपने आज घोषणा केली, असं ओवैसी म्हणाले.

दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद कशी तुटली? हे पुढच्या अनेक पिढ्यांना आम्ही सांगू, असंही ओवैसी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“…तर आम्ही 2 तासात शाहीन बाग रिकामं केलं असतं”

-‘व्हॅलेंटाईन डे’ ची भन्नाट ऑफर; हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास पुढची 18 वर्ष मोफत स्टे!

-राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्तेची सरकारकडे ‘ही’ मागणी

-कुछ दिन छुट्टी चाहिए… डॅडींचा सुट्टीसाठी अर्ज

-राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये ‘दलित’ असणार- अमित शहा