राज ठाकरेंकडून पुन्हा पंतप्रधान मोदींचं कौतुक!

मुंबई | अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या नावाने ट्रस्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन, असं राज यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’च्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याने देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे. मोदींनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना देण्यात आली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मोदींनी आत्ताच राम मंदिर ट्रस्टची घोषणा का केली?; ओवैसींनी सांगितलं कारण

-‘व्हॅलेंटाईन डे’ ची भन्नाट ऑफर; हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास पुढची 18 वर्ष मोफत स्टे!

-राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्तेची सरकारकडे ‘ही’ मागणी

-कुछ दिन छुट्टी चाहिए… डॅडींचा सुट्टीसाठी अर्ज

-राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये ‘दलित’ असणार- अमित शहा