ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!

बंगळुरू | एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैंसी बोलण्यासाठी उभे असतानाच एका तरुणीनं व्यासपीठावर येऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार घडला आहे. अमुल्या असं या तरुणीचं नाव असून यावेळी एमआयएमच्या कार्यकत्यांनी घोषणा देण्यापासून तिला रोखण्याचा प्रयत्न केला.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या कायद्याविरोधात बंगळुरमध्ये ओवैसी यांची सभा झाली. यावेळी अमुल्या नावाच्या तरुणीनं व्यासपीठावर येत माईक हातात घेतला आणि पाकिस्तान जिंदाबाद…, हिंदुस्थान जिंदाबाद… पाकिस्तान जिंदाबाद… अशा घोषणा दिल्या. त्यानंतर एमआयएमच्या कार्यकत्यांनी तिला ओढत व्यासपीठावरुन खाली नेलं.

तरुणीने व्यासपीठावर येऊन घोषणा देऊ लागल्याने एकच गोंधळ उडाला. त्यांनतर एमआयएम कार्यकर्ते आणि ओवैसी यांनी त्या तरुणीला रोखण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिसांनीही त्या तरुणीला घोषणा देण्यापासून रोखलं. दरम्यान, तरुणी पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्थान जिंदाबाद यांमधील फरक सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहिल, असं ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”

-तलवारीचं उत्तर तलवारीने देऊ; मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

-एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर 15 कोटीच राहाल- जावेद अख्तर

-‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर इंदोरीकर महाराजांची कोलांटीउडी; म्हणतात…

-राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत!