भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प

कोलोराडो |  भारत दौऱ्याच्या वेळी किमान एक कोटी लोकं आपल्या स्वागतासाठी हजर राहणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत दौऱ्यापूर्वी त्यांच्या अमेरिकेत अनेक जाहीर सभा सुरू आहेत. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

24 आणि 25 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दिल्ली, अहमदाबाद आणि आग्र्याला ते भेट देणार आहे.

या दौऱ्यावेळी स्टेडिअमपर्यंत एक कोटी लोकांकडून माझं स्वागत होणार असल्याचं मला समजलं आहे. ही संख्या 60 लाख ते 1 कोटी असू शकते. माझ्या स्वागतासाठी इतकी गर्दी होणार असल्यामुळे मी लोकप्रिय झालो आहे, हे त्याचंच द्योतक आहे. इतक्या गर्दीमुळे स्टेडिअमही पूर्ण भरणार असून स्टेडिअम बाहेर गर्दी ओसंडून वाहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे एका जाहीर सभेत ट्रम्प यांनी भारताच्या धोरणावरही टीका केली. भारताने अमेरिकेकडून आतापर्यंत व्यापार शुल्क खूपच वसूल केलंय. भारत दौऱ्यात मी यावर चर्चा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावर चर्चा करणार असून व्यापार शुल्कात कपात होईल अशी अपेक्षा असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!

-“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”

-तलवारीचं उत्तर तलवारीने देऊ; मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

-एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर 15 कोटीच राहाल- जावेद अख्तर

-‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर इंदोरीकर महाराजांची कोलांटीउडी; म्हणतात…