मुंबई | काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर काही तासांतच काँग्रेसमधील नाराजी बाहेर येताना दिसत आहे. 18 वर्षांची तपस्या व्यर्थ ठरल्याच्या भावना अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगढ़ी यांना महाराष्ट्रातील पक्षाचे उमेदवार म्हणून आक्षेप घेत हा काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचं म्हटलं आहे.
आशिष देशमुख यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांनी हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे.
बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षाला विकासाच्या दृष्टीने फायदा होणार नाही. हा महाराष्ट्रातील सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, असं आशिष देशमुख म्हणालेत.
काँग्रेसने पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि कवी असलेले 34 वर्षीय इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला आहेे, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही”
“बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही”
काॅंग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश!
मोठी बातमी ! राज ठाकरे रुग्णालयात दाखल
“उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर