“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद विरूद्ध भाजप असा सामना रंगताना दिसतोय. आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी भाजपवर निशणा साधला आहे.

अंगावर आलात कर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही, असं म्हणत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ, दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याआधी आम्ही घरात घुसण्याची भाषा करता. लुच्चा कोण म्हणालं किरीट सोमय्या, त्याला उत्तर मी दिलं. पंतप्रधानांचा दर्जा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाही का?, असा सवाल त्यांनी भाजपला केलाय.

हे बोलणार आणि आम्ही गप्प बसणार हे कितपत योग्य आहे. त्यांनी गप्प बसावं. मग आम्ही बोलणार नाही. भाजपला फक्त मातोश्री दिसते का, अशी टीका दीपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी केलीये.

मुख्यमंत्र्यांना दर्जा नाही का ? का म्हणून आम्ही तुम्हाला घाबरुन जायचं?, अस त्या म्हणाल्या. माझ्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. शिवसैनिक गप्प बसणार आहे नाही?, असा इशारा त्यांनी दिला होता.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-  

“बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही” 

  काॅंग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

  मोठी बातमी ! राज ठाकरे रुग्णालयात दाखल

  “उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर

  काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा