‘संजय राऊतांनी गजनी बघावा’, भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळले व राज्यात नवे शिंदे सरकार सत्तेत आले.

सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. मात्र, शपथविधी होऊन 15 दिवस उलटून गेले पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरायला सुरूवात केली आहे.

दोन मंत्र्यांवर सरकार चालत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची आवश्यकता असते, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तर घटनेचा दाखला देत हे सर्व काय चालले आहे?, असा सवाल देखील राऊतांनी राज्यपालांना विचारला आहे.

एवढ्यावर न थांबता संजय राऊतांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत फिल्म निर्माते असल्याने त्यांना सल्ला आहे की त्यांनी गजनी सिनेमा नक्की बघावा. ज्या लोकांना विसरण्याची सवय आहे अशा पंडितांनी गजनी अवश्य बघावा, असा टोला शेलारांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 32 दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यामुळे त्यांचं सरकारच अनाधिकृत होतं का? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.

हे सरकार संविधानिक पद्धतीने चाललं आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवटीचा विषयच नाही. काहीही विषय नसताना बुद्धीभेद करून आपण अशा वार्ता करू नयेत, असा खोचक सल्ला देखील शेलारांनी संजय राऊतांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

“गेल्या 56 वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते…”; बंडखोरांवर राऊत पुन्हा एकदा बरसले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा झटका!

“4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…”