बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार, शिवसेना नेत्याने मानले भाजपचे आभार

मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. या ऐतिहासिक बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगलेली पाहायला मिळाली.

महाराष्ट्रात शिंदे सरकार सत्तेत आलं व एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दुसरीकडे मात्र शिंदे गट व शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं समोर येत आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येत चर्चा करणार असल्याचं दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. शिवसैनिकांच्या भावनांचा आदर ठेवत दोघे जण चर्चा करणार असल्याचं समजल्यावर बरं वाटल्याचं देखील दीपाली सय्यद ट्विटमध्ये म्हणाल्या.

शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली तर उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखांची भूमिका मोठ्यामनाने निभावली असल्याचं दीपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या मध्यस्ती करीता भाजपच्या नेत्यांनी मदत केली यासाठी दीपाली सय्यद यांनी आभार व्यक्त केले आहेत. तर भेटीच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल असंही सय्यद म्हणाल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘संजय राऊतांनी गजनी बघावा’, भाजप नेत्याचा हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

“गेल्या 56 वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते…”; बंडखोरांवर राऊत पुन्हा एकदा बरसले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा झटका!