विनाशकाले विपरीत बुद्धी; आशिष शेलारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. यावरच भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

मुंबईच्या विकासकामाला राजकारणात बघणं हे मुंबईकरांच्या स्वप्नांला भंग करण्यासारखं आहे. राजकारण आणि विकासकामं यातला फरक नवीन सरकारने समजून घ्यावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

केवळ स्वत:च्या अहंकारापोटीचं राजकारण संपूर्ण महिनाभर महाराष्ट्र पाहत होता तेच आता सत्तेत आल्यानंतर स्वत:च्या अहंकारापोटी मुंबईकरांची स्वप्न भंग करण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पुढचा विचार केला जाईल, तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-