मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.  मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आधी सचिवांची बैठकी घेतली. त्यानंतर त्यांनी दुसरी कॅबिनेट बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत आरेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.

आरे कारशेडला स्थगिती दिली. मला रात्रीची झाडांची कत्तल चालणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही माझी मेट्रोला स्थगिती नाही, तर कारशेडला स्थगिती दिली आहे. आरेमधलं पानही तोडलेले मला चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महागाई, टंचाई, भ्रष्टाचार हे अजूनही तसंच आहे, मी विधानसभेचे सभागृह अजूनही बघितलेले नाही. तसंच टीका करताना चुका दाखवा, ओरबाडणे म्हणजे टीका करणे नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडमध्ये झाडं कापण्याचा निर्णय घेतला होता. एका रात्रीत ही झाडं कापल्यामुळे शिवसेना यावर चांगलीच आक्रमक झाली होती. 

 

महत्त्वाच्या बातम्या-