आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही- अशोक चव्हाण

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-2021 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. भाजप नेत्यांनी आजच्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांनी मात्र आजचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्राने यापूर्वीही केली होती. पण त्यासाठी कृषी विकासदर 11% हवा होता तो आज केवळ 2% आहे तर मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार? हे सरकारने सांगायला हवं, असं ते म्हणाले आहेत. शेतीसाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर झाला आहे पण तरतुदीत विशेष वाढ नसल्यानं शेतकऱ्यांना यातून काहीही मिळणार नाही किंबहुणा आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही, असं चव्हाण म्हणाले आहेत.

2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे दावे सातत्याने केले जात आहेत. पण त्यासाठी विकासदर 9 टक्के असायला हवा. गेल्या तिमाहीत आपण त्याच्या निम्मा म्हणजे 4.5 टक्केही विकासदर गाठू शकलेलो नाहीये. या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प ‘जुमलनॉमिक्स’ नाही तर काय आहे?? अशी टीका त्यांनी केली आहे.

केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांचं बेरोजगारीसारख्या ज्वलंत समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. गरीब, मध्यमवर्गीय, नोकरदार यांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे उत्पादकता आणि रोजगारालाला प्रोत्साहन मिळणार नाही, अशी भितीही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रवार अन्याय- उद्धव ठाकरे

-आजचं बजेट एका वर्षाची दिशा देऊ शकत नाही तर दशकाची दिशा काय देणार?? जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांच्या 3. 6 लाख कोटी रूपयांना झटका!

-मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न; अर्थसंकल्पावर जलीलांची टीका

-देशाच्या शेतीचं आकारमान केवढं??… तरतूद किती कमी करताय; राजू शेट्टी अर्थसंकल्पावर नाराज