विनोद तावडेंच्या ‘त्या’ टीकेला अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

मुंबई | नांदेडमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे नेते विनोद तावडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. तसेच विधानसभा न लढण्याचा सल्ला दिला होता. यालाच अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, असं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.

मला फुकटचा सल्ला देऊ नये. मी निवडणूक लढवावी किंवा नाही हे माझा पक्ष ठरवेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो, याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे, असा टोला चव्हाणांनी तावडेंना लगावला.

दरम्यान, लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात त्यामुळे विधानसभेत झाकली मुठ ठेवा.  विधानसभा निवडणूक लढवू नका, अशी टीका विनोद तावडेंनी केली होती. 

महत्वाच्या बातम्या-