तर त्यादिवशी ईडीच्या ऑफिसला पाहुणचारासाठी जाईल- शरद पवार

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध ईडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. मंगळवारी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता बुधवारी शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत आपलं मतं मांडलं आहे.

मी एक महिनाभर निवडणुकीसाठी बाहेर असेन म्हणून आज तुम्हाला भेटलो आहे. 27 सप्टेंबरला ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. अधिकाऱ्यांना जी माहिती पाहिजे ती देईन. जर काही पाहुणचार असेल तो पण स्वीकारेन, असं शरद पवार म्हणाले. 

महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. या राज्यावर त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार शिकवलेला नाही, असं पवारांनी ठणकावलं आहे.

मी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच ईडीच्या कार्यालयात मी स्वत: 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर माझा संपूर्ण विश्वास आहे, असं मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, काल संध्याकाळपासून टीव्हीवरून माहिती माझ्या कानावर आली. ईडीने शिखर बँकेबाबत माझ्याविरोधात खटला दाखल केला यात माझं नाव आहे हे समजलं, असं शरद पवारांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-