‘हे’ भाजपचं हे ऑपरेशन लोटस नसून, कोरोना व्हायरस आहे; अशोक चव्हाणांचा भाजपला टोला

मुंबई| मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जातं आहे. काँग्रेसच्या काही आमदारांना कोट्यवधीची ऑफर देऊन खरेदी केलं जात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांना डांबून ठेवल्याचंही समोर आलं.

मध्य प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेस आघाडीतले आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. भाजपानं या आमदारांना ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रतही उमटत आहेत. कमलनाथ एक सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही. ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी लोकशाही मानणार्‍या सर्व पक्षांनी घेतली पाहिजे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

खरं तर भाजपचं हे ऑपरेशन लोटस नसून, कोरोना व्हायरस आहे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असा टोलाही अशोक चव्हाणांनी भाजपाला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-कोरोनाच्या भीतीने नरेंद्र मोदींनी घेतला होळी न खेळण्याचा निर्णय!

-घरात वडीलांचा मृतदेह, अन् मुलाच्या डोळ्यासमोर भविष्याचं ध्येय!

-सुप्रिया ताई, सुनेचा छळ करणाऱ्या विद्या चव्हाणांविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?; भाजपचा सवाल

-CAA ला विरोध करणाऱ्या दोन भाजप नगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी!

-“आरोग्य सुविधांवर अफाट खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी?”