कोरोनाच्या भीतीने नरेंद्र मोदींनी घेतला होळी न खेळण्याचा निर्णय!

दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. तज्ञांनी नरेंद्र मोदींना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, जगभरातील तज्ञांनी कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कोरोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचं तसंच एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “घाबरण्याची गरज नाही. आपल्याला एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्त्वपूर्ण पाऊल उचला.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी एक पोस्टर ट्विट केलं. यामध्ये स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वारंवार हात धुण्यासंबंधी तसंच डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श न करण्यासंबंधी सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन व्हायरसचा फैलाव होणार नाही. याआधी संसद परिसरात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा पार पडली.

 

महत्वाच्या बातम्या- 

-घरात वडीलांचा मृतदेह, अन् मुलाच्या डोळ्यासमोर भविष्याचं ध्येय!

-सुप्रिया ताई, सुनेचा छळ करणाऱ्या विद्या चव्हाणांविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?; भाजपचा सवाल

-CAA ला विरोध करणाऱ्या दोन भाजप नगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी!

-“आरोग्य सुविधांवर अफाट खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी?”

-ठाकरे सरकारने केली शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा; शंभर युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज