गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

जयपूर |  कोरोनाच्या कठीण काळात अशोक गेहलोत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 5 कोटी लोकांना मोफत गहू वाटप करण्याच्या निर्णय त्यांनी घेतला आहे. बुधवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.

5 कोटी लोकांना प्रत्येकी 10 किलो मोफत गहू मिळणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. जवळपास 60 लाख लोकांना गहू मिळत नव्हते, अशा तक्रारी रेशन दुकांनावरून येत होत्या. यासाठी गव्हाची खरेदी बाजारामधून करण्याची योजना त्यांनी आखली आहे.

राज्य सरकार 21 रूपये प्रति किलोने गहू खरेदी करणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा गरीब आणि वंचित लोकांना मिळणार आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेत जे लोकांना रेशन मिळत नाहीत अशा लोकांना देखील मोफत गहू वाटप करण्याचा निर्णय गेहलोत सरकारने घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला 10 किलो मोफत गहू दिला जाणार आहे.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षायोजनेअंतर्गत राज्यातील 5 कोटी लोकांना मोफत धान्य मिळालं असतं. याच योजनेखाली प्रत्येक नागरिकाला 10 किलो गहू मिळाला असता. परंतू केंद्र सरकार आताच्या परिस्थितीत गहू कमी देत आहे. आम्हाला गहू मिळत नाही, असा लोकांचा सूर होता. 2011 च्या जनगणनेनुसार केंद्र राज्याला गहू वाटत आहे. त्यामुळे गहू कमी मिळत आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही???”

-गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

-राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलेला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहीती

-…तर चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचं कशाला?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल