मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूड मधील अनेक वाईट गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींवर अ.न्याय, अ.त्याचार झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींनी अनेकवेळा याविरुद्ध आवाजही उठवला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करनंही तिच्या करिअर मधील असाच धक्कदायक अनुभव सांगितला होता.
चित्रपट क्षेत्रात करिअरच्या सुरुवातीला स्वरा भास्करलाही अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचं स्वरानं सांगितलं होतं. चित्रपट क्षेत्रात काम देतो असं म्हणून अनेक पुरुषांनी स्वराला विविध मागण्या केल्याचं स्वरानं म्हटलं होतं. मात्र, या लोकांना हवी असणारी गोष्ट मी देवू शकणार नाही असा अंदाज येवू लागल्यानंतर हे लोक मेसेजचा रिप्लाय देणं बंद करायचे, असंही रियानं सांगितलं होतं. रियानं एका शूटिंग दरम्यानचा आपला अनुभवही शेअर केला होता.
एकदा स्वरा 56 दिवसांच्या शूटिंगसाठी आपल्या टीम बरोबर आऊटडोअर शूटिंगसाठी गेली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संबंधित दिग्दर्शक रोज त्रास द्यायचा. तसेच हा दिग्दर्शक रात्र झाली की फोन करण्यास सुरुवात करायचा. हा दिग्दर्शक कायम आपल्या मागावर असायचा, असं रियानं म्हटलं होतं.
चित्रपटाच काम आहे असं सांगून हा दिग्दर्शक हॉटेलच्या रूमवर बोलवायचा. माझ्या समोरच हा दिग्दर्शक हातात दारूची बाटली घेवून बसायचा. एक दिवस दारू पिलेल्या अवस्थेत हा दिग्दर्शक माझ्या खोलीत शिरला आणि मला मिठी मारण्यास सांगितलं, असा किस्सा स्वरानं सांगितला होता.
माझ्या आयुष्यात घडलेल्या अशा गोष्टींमुळे माझ्या मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. दिग्दर्शकानं रूममध्ये केलेल्या त्या कृत्यानंतर मी पॅकअप झाल्यावर रूममध्ये लाईट्स बंद करून बसायचे. ज्यामुळे त्या दिग्दर्शकला मी झोपले आहे असं वाटायचं आणि तो रूमकडे येत नसायचा, असंही स्वरानं सांगितलं होतं.
दरम्यान, स्वरा भास्करप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील अशा बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच मध्यंतरी सोशल मिडियावर वेगानं पसरलेल्या ‘हॅशटग मी टू’चा वापर करून अनेक अभिनेत्रींनी चित्रपट सृष्टीत घडणाऱ्या अशा वाईट गोष्टींना वाचा फोडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पीके’ सिनेमातील डिलीट केलेला सीन व्हायरल; सुशांतचे चाहते आमीर खानवर संतापले!
रिया चक्रवर्तीनं दिलेला ‘तो’ इशारा ठरला खरा; केला मोठ्या नावांचा खुलासा
सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर न्यायालयाची मोठी सुनावणी
तर मी माझ्या मुलीसोबत लग्न केलं असतं असं म्हणाले होते महेश भट्ट; कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूड रिया चक्रवर्तीला का सपोर्ट करतंय; अनुराग कश्यपनं सांगितलं ‘हे’ कारण