‘पीके’ सिनेमातील डिलीट केलेला सीन व्हायरल; सुशांतचे चाहते आमीर खानवर संतापले!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी बॉलिवूड मधील वाईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता सुशांतचे चाहते अभिनेता आमीर खान व राजकुमार हिरानी यांना प्रचंड ट्रोल करत आहेत.

आमीर खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी ‘पीके’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिकेत होता तर सुशांत सरफराज नावाच्या व्यक्तीच्या भूमिकेत होता. या चित्रपटादरम्यान सुशांत केवळ 15 मिनिटे पडद्यावर दिसला होता. याच ‘पीके’ चित्रपटातील एक सीन सध्या प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. हा सीन चित्रपटातून डिलीट करण्यात आला होता.

डिलीट केलेल्या या सीनमध्ये सुशांत व अनुष्का पीकेबद्दल बोलताना दिसत आहेत. या सीनमध्ये अनुष्का व सुशांत दोघेही इमोशनल होतात. पीके चित्रपटातून डिलीट करण्यात आलेला हा सीन समोर आल्यानंतर सुशांतचे चाहते आमीर खान व राजकुमार हिरानी यांच्याबद्दल सोशल मिडियावर संताप व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुशांतच्या बेस्ट परफॉर्मन्सपैकी हा एक बेस्ट परफॉर्मन्स होता. पण सुशांतचा हा सीन सिनेमातून डिलीट करण्यात आला आहे. पण यामागचं कारण काय आहे, हे मात्र समजू शकलं नाही, अशी एका युजरने सुशांतच्या या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच अन्य एका युजरने अमीर खानवरच निशाणा साधला आहे. हा सीन पाहून अमीर खानला असुरक्षित वाटलं असावं म्हणून त्यानं हा सीन चित्रपटातून डिलीट केला आहे, असं एका युजरनं ट्वीटरवर म्हटलं आहे.

दरम्यान, एका युजरनं तर चक्क राजकुमारी हिरानी यांना लक्ष केलं आहे. या युजरनं राजकुमार हिरानी यांना जाब विचारला आहे. हा सीन चित्रपटातून का डिलीट केला गेला, याच राजकुमार हिरानी यांनी उत्तर द्यावं, असं या युजरनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्तीनं दिलेला ‘तो’ इशारा ठरला खरा; केला मोठ्या नावांचा खुलासा

सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर न्यायालयाची मोठी सुनावणी

तर मी माझ्या मुलीसोबत लग्न केलं असतं असं म्हणाले होते महेश भट्ट; कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड रिया चक्रवर्तीला का सपोर्ट करतंय; अनुराग कश्यपनं सांगितलं ‘हे’ कारण

मे महिन्यातील आकडेवारी सर्वात धक्कादायक; इतक्या लाख लोकांना झालाय कोरोना!