मनसेत नुकतीच घरवापसी केलेल्या ‘या’ नेत्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

औरंगाबाद | नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्यावर आहे. या प्रकरणाची औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने जाधवांविरोधात लेखी तक्रार दाखल केली.

पीडित व्यक्तीने पोलिसांकडे हर्षवर्धन जाधवांवर अ‌ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल केला.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांना हर्षवर्धन जाधव यांनी सडकून टीका केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चिडका विराट; सामना गमावल्यानंतर पत्रकारावर भडकला!

-पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय; शेलार आणि राष्ट्रवादीमध्ये ट्वीट वॉर

-पोंक्षे, काय डोक्यावर पडलाय काय?; ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड भडकले

-पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय- अमोल मिटकरी

-आशिष शेलारांची राष्ट्रवादीला बेडकाची उपमा; रोहित पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर