मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे.
राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती. मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.
मृत व्यक्ती परदेशातून आली होती. या व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. अखेर आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईत आज नव्याने 6 तर पुण्यात 4 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्याम, याआधी कोरोनाचा पहिली बळी मुंबईतील कस्तुरबामध्ये 64 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यु झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
-“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पुर्ण करुया, भारताला कोरोनापोसून वाचवूया”
-“विराट इतर खेळाडूंसारखा नौटंकी करत नाही, क्रिकेटप्रती त्याला आदर आहे”
-कोरोनाची लागण झाली कनिकाला, पण चिंता वाढली नेतेमंडळींची!
-पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!