सलग पाचव्या वर्षी जलील मुक्तीसंग्राम ध्वजारोहणाला गैरहजर

औरंगाबाद : हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. गेली पाच वर्षे जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे.

औरंगाबादमध्ये विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यापासून इम्तियाज जलील हे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जलील यांचा विजय झाला आणि ते औरंगाबादचे खासदार झाले. त्यामुळे यंदा ते मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे सर्वांना अपेक्षित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानात हैदराबाद मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले.

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा सोडून ध्वजारोहणाला हजर झाले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र दांडी मारली. तर कार्यक्रमातील जलील यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.

माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही,” असे उत्तर दिले होते. 

 

महत्वाच्या बातम्या-