…म्हणून #PappuThackeray हॅशटॅग देशभरात ट्रेंड होतोय

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील 2702 झाडं शिवसेनेने झाडं कापण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे तर भाजपाने या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे.

मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याची भूमिका युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. मात्र एकीकडे सत्तेत असताना दुसरीकडे विरोध करत आदित्य ठाकरे मुंबईकरांना वेड्यात काढत असल्याचं आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी ट्विटवरुन केला आहे.

आरेमधील वृक्षतोडीला विरोध दाखवत शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप करताना मेनन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी #PappuThackery हा हॅशटॅग वापरला. त्यामुळे हा हॅशटॅग भारतात ट्रेण्ड होत आहे.

मेनन यांनी ट्विटवरुन शिवसेना-भाजपा युतीवर आरे कॉलीनीतील वृक्षतोड करण्यावरुन टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईमध्ये केवळ रियल इस्टेट आहे. त्यामुळेच त्यांनी लोढा यांना शहराध्यक्ष केलं आहे, असा आरोप मेनन यांनी ट्विटवरुन केला आहे. तसेच मेनन यांनी यावरुन आदित्य ठाकरेंनाही सुनावलं आहे.

मेनन यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान केलं आहे. आरेतील मेट्रोचे काम थांबवून दाखवा नाहीतर तुम्ही पप्पूच आहेत हे सिद्ध होईल असं मेनन एका ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-