बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

नवी दिल्ली | कमांडिंग ऑफिसर स्वत: पुढे राहून नेतृत्व करत होते. या सैनिकांचे बलिदान वाया जाता कामा नये, सरकारने चीनच्या या कृतीचा बदला घेतला पाहिजे, असं एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

असदुद्दिन ओवैसी यांनी चीनचा निषेध केला आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन बरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या तीन वीरांच्या पाठिशी संपूर्ण भारत उभा आहे, असं असदुद्दिन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

शहीद झालेले कर्नल आणि दोन वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ओवैसी यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली लेकीची अवस्था, म्हणाला…

-“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”

-महाराष्ट्रातील या शहरानं करुन दाखवलं; 900 पर्यंत गेलेला कोरोनाबाधितांचा आकडा 90च्या आत आणला!

-‘ही’ गोष्ट सर्वात धोकादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा