मुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….

मुंबई |  शिवसेनेने जरी भाजपची साथ सोडलेली असली तरी शिवसेनेबद्दल अजून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात सेनेबद्दल तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा आहे, असं म्हणावं लागेल. त्यांच्या बोलण्यात कायम शिवसेनेबद्दल आत्मीयता दिसून येते. शिवसेनेचा त्याग मोठा आहे. फक्त मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

शिवसेनेचा त्याग मोठा आहे अन् शिवसेनेला पदाचा मोह नाही हे देखील तितकच खरं आहे. फक्त मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली नाही, असं म्हणणं योग्य होणार नाही, असं ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

‘खाट का कुरकुरतेय’ या मथळ्याखाली शिवसेनेने अग्रलेख लिहीत काँग्रेसला चिमटे काढले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या अग्रलेखात शिवसेनेचा त्याग मोठा आहे, असं म्हटलं गेलं होतं. याच वक्तव्याचा संदर्भ देत मुनगंटीवार बोलते झाले.

शिवसेनेने शिवसैनिकांना आपला मुख्यमंत्री करेन असा शब्द दिला होता. ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी 25 वर्ष असलेल्या मैत्रीचा त्याग केला अन् त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण केला, असंही मुनगंटीवार म्हणाले.

अग्रलेखातून काँग्रेसला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी त्या पाळाव्यात. काँग्रेस फार अ‍ॅडजस्टमेंट करणारा पक्ष आहे. तुम्ही त्यांना राज्यसभेत जागा द्या किंवा नका देऊ, विधानसभेत जागा द्या किंवा नका देऊ. काँग्रेस शिवसेनेनेला किती धमक्या देत असेल तरी शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता ही काँग्रेसमध्ये असू शकत नाही, असा टोमणा देखील त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

-सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली लेकीची अवस्था, म्हणाला…

-“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”

-महाराष्ट्रातील या शहरानं करुन दाखवलं; 900 पर्यंत गेलेला कोरोनाबाधितांचा आकडा 90च्या आत आणला!