क्रिकेटमधील खूप कॅच पाहिले असतील, असा पाहिला का???; भन्नाट कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली | दोघांनी आलिंगन देणं हे आपल्या भावना प्रकट करण्याचा उत्तम माध्यम मानलं जातं. अनेकदा आपण मित्रांना आलिंगन देतो.

खेळभावना जपत असताना संघातील खेळाडू देखील एकमेकांना आलिंगन देताना अनेकदा पाहिलं आहे. अशातच एक क्रिकेटच्या मैदानावरील व्हि़डीओ सध्या व्हायरल होत आहे.

युरोपियन क्रिकेट लीगमधील सामन्यातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सिमारेषेजवळ फलंदाजानं टोलावलेला चेंडू झेलतानाचा व्हिडीओ आहे.

फलंदाजानं टोलावलेला चेंडू पकडण्यासाठी दोन खेळाडू चेंडूच्या दिशेनं धावत आले आणि एकमेकांना आलिंगन देत त्यांनी झेल पकडला आहे.

एकतेमध्ये बळ असतं असं म्हटलं जात असलं तरी दोन्ही खेळाडूंनी प्रत्यक्षात मैदानात एकता दाखवत झेल पकडला आहे. परिणामी त्यांचं कौतूक करण्यात येत आहे.

पंजाब लायंस निकोसिया आणि पाक आई केयर बाडालोना या संघांदरम्यान चुरशीचा सामना चालू असताना हा प्रसंग घडला आहे. सध्या झेल पकडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बाडालोनाचा फलंदाज सिकंदर अलीला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवण्यात पंजाब लायंसचा गोलंदाज सुशील कुमार यशस्वी ठरला आहे.

दरम्यान, पंजाब लायंसला अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा फायदा सामना जिंकण्यासाठी झाला नाही. बाडालोनानं हा सामना 14 धावांनी जिंकला आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 काळजी घ्या…! पुढील 3 दिवस अंगाची लाहीलाही होणार, राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल