Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धादरम्यान इस्राईलवर सर्वात मोठा हल्ला

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) आता 20 दिवस होत आले आहे. जगातील अनेक देशांनी रशियाच्या विरूद्ध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय.

रशिया युक्रेन युद्ध तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरत आहे. या युद्धात दोन्ही देश तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं पहायला मिळतंय.

युक्रेनला स्टारलिंकने मदत केल्याने आता युक्रेन रशियाला झुंज देताना दिसत आहे. अशातच आता रशिया युक्रेन युद्धादरम्यान इस्राईलवर सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

इस्राईलमधील अनेक सरकारी वेबसाइट्स क्रॅश झाल्या आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय, न्याय आणि कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटचा समावेश आहे.

एका इस्राईली वृत्तपत्राने मंगळवारी ही माहिती दिली आहे. इस्राईलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला म्हणून याकडे पाहिले जातंय.

या सर्व वेबसाइट आता पुन्हा सुरू झाल्याची माहिती इस्राईलच्या नॅशनल सायबर डायरेक्टोरेटने दिली आहे. हा हल्ला डिजिटल-डिनायल ऑफ सर्विस(DDoS) हल्ला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

देशभर चर्चेत असणाऱ्या ‘The Kashmir Files’वर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल