आमच्या औषधाने फक्त तीनच दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होणार; बाबा रामदेव यांचा दावा

नवी दिल्ली | योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिले औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ असं या औषधाचं आहे. रामदेव बाबा यांनी हे औषध आज लॉन्च केलं. कोरोनाला हरवण्यासाठी हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.

पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे कोरोनिल औषध तयार केले आहे. यासंदर्भात आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीकडून ते औषध कशा प्रकारे काम करते याची माहिती दिली आहे. तसेच हे औषध कशा प्रकार तयार करण्यात आले याची माहितीही बाबा रामदेव यांनी दिली.

लोक या औषधावर प्रश्न उपस्थित करत असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत. या औषधाच्या चाचण्या रुग्णांवर घेण्यात आल्या असून यातील ६९ टक्के रुग्णांचे अहवाल केवळ तीनच दिवसात निगेटिव्ह आले आहेत, तर पुढच्या ७ दिवसांत करोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. या औषधाचा प्रयोग आतापर्यंत २८० लोकांवर करण्यात आला आहे, यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पतंजली रिसर्च इस्न्टिट्यूटमध्ये यावर ५ महिने संशोधन केले असून उंदरांवर याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत तर क्लिनिकल कंट्रोल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे, असं आचार्य बालकृष्णन यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

-ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

-“आज गौप्यस्फोट करतोय; अजित पवारांआधी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती”

-नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…

-…म्हणून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढले- देवेंद्र फडणवीस