जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

झगर्ब | आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सोमवारी टेनिसपटून जोकोविच आणि ग्रिगोर द्विमित्रोर हे दोघंही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. नोवाक जोकोविच सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोवाकच्या पत्नीलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिला कोरोनाची लागण झाली आहे. बेलग्रेडमध्ये नोवाकने करोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे.

यासंदर्भात एक पत्रकही जारी करण्यात आलंय. त्यात नमूद केल्यानुसार, नुकत्यात आयोजित केलेल्या एका स्पर्धेत नोवाक सहभागी झालो होतो. त्यादरम्यान त्याने सर्व काळजीही घेतली होती. तरीही काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर सर्वांची चाचणी केल्यानंतर नोवाकचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचं समजलं.

सध्या जोकोविच एड्रिया टूरमुळे चर्चेत होता. इथला अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नोवाक क्रोएशियाला निघून गेला होता. यानंतर त्याने आपली चाचणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

-“आज गौप्यस्फोट करतोय; अजित पवारांआधी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती”

-नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…

-…म्हणून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढले- देवेंद्र फडणवीस

-भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते, पण… फडणवीसांचा धक्कादायक खुलासा