राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

हैदराबाद | दीर्घ काळ चाललेल्या न्यायालायीन, कायदेशीर लढाईनंतर आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस उजाडला आहे. अयोध्या नगरीत दिवाळीच चालू आहे.  अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसींनी खळबळजनक ट्विट केलं आहे.

बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल, असं ट्विटकरत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकला आहे. औवेसींने ट्विटमध्ये ‘बाबरी जिंदा है, असा ह‌ॅशट‌गही वापरला आहे.

बाबरी ही मशीद असून ती कायम राहणार आहे. ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. ज्यावेळी मशीदीत 1949 मध्ये गुप्तपणे मूर्ती ठेवण्यात आली होती. यानंतर 1992 मध्ये मशीद पाडण्याची घटना घडली आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या पुढच्या पीढीला आपली मशीद पाडण्यात आली असं सांगणार असल्याचं  औवेसींनी म्हटलं आहे.

दरम्यान, औवेसी राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी असं ट्विटकरून समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला; 25 वर्ष आमदारकी बजावणाऱ्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन

मुख्यमंत्रिपदावर असताना मुलीच्या मार्कांमध्ये निलंगेकरांनी बदल केला होता

कोरोनाच्या उपचारानंतर ‘या’ व्याधींना तोंड द्यावं लागू शकतं; जाणून घ्या

अखेर तो दिवस आला, अयोध्यानगरी सज्ज झाली; आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन

‘…नाहीतर अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील’; चीनची अमेरिकेला धमकी