लोक झोपेत असताना शपथविधी नाहीये… तर लोकांना आवर्जुन पाहता येईल असा आहे- बच्चू कडू

मुंबई | महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी आहे! जय महाराष्ट्र, असं ट्वीट करत त्यांनी फडणवीस आणि भाजपला डिवचलं आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्री तसेच राज्यातील अनेक नेते या शपथविधीसाठी उपस्थित होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शपथबद्ध झाले. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुन शपथ घेतली. यानंतर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे देखील शपथबद्ध झाले.

 

बच्चू कडू यांचं ट्वीट-

 

 

महत्त्वाच्या बातम्या-