उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् काँग्रेसने भाजपला सुनावलं!

मुंबई | चार दिवसांपूर्वी ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची ओळख परेड झाली होती. यावेळी आपले संख्याबळ दाखवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सर्व आमदारांचं एकत्रित फोटोसेशन केलं होतं. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडविली होती. त्यांच्या याच टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.

फोटो आमचा , फोटोग्राफर आमचा, फोटोफ्रेममध्ये आम्हीच आणि फोटोफिनिश नव्हे तर क्लीनफिनिशही आमचाच, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी आशिष शेलार यांना उत्तर दिलं आहे.

फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला होता.

दरम्यान,  महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्री तसेच राज्यातील अनेक नेते या शपथविधीसाठी उपस्थित होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-