“…तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रिपदाने फरक पडत नाही”

अमरावती | विदर्भाती प्रकल्पग्रस्त शेतकरी (Project affected farmers) आपल्या विविध मागण्यांसाठी आठवडाभरापासून अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. मात्र तरी देखील मागण्या मान्य होत नसल्याने बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती.

म्ही न्यायासाठी उपोषणाला बसला आहात की, माझ्या राजीनाम्यासाठी?. मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तुमची ईच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो, असं बच्चू कडू म्हणालेत.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीत आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत.

शुक्रवारी रात्री भरपावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे” 

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल भलामोठ्ठा पगार

‘…तर तिसरं महायुद्ध अटळ आहे’; जो बायडन यांचं मोठं वक्तव्य 

Russia Ukraine War: युक्रेनच्या ‘या’ नव्या दाव्यानं रशियाचं टेन्शन वाढलं 

 “आताच बसलोय, परत या”, सोशल मीडियावर आज दिवसभर फक्त ‘या’ व्हिडीओचीच चर्चा