ठाकरे सरकारने केलेली 2 लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी; मंत्री बच्चू कडू यांचं वक्तव्य

पुणे |  महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची 2 लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयावर भाजपने ही फसवी कर्जमाफी असल्याची जोरदार टीका केली. यानंतर आता ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शेतकरी कर्जमाफीवरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं अगणित नुकसान झालं आहे. त्या नुकसानीचा आपण अंकात विचार करू शकत नाही. त्यामुळे मी तर म्हणतो सरकारने केलेली 2 लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे, असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं. पुण्याच्या आळंदीत वारकरी सांप्रदायाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना किती लुटलं याचा हिशेब जर शेतकऱ्यांनी घ्यायचं ठरवलं तर शेतकऱ्यांचेच पैसे सरकारच्या डोक्यावर असतील याचाही हिशेब कधीतरी सरकारने द्यायला पाहिजे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीवरून भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. कडू यांनी सरकारला घरचा आहेर देऊन भाजपच्या हातात आयतं कोलित दिल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार??; चंद्रकांत पाटील यांचा मोठा खुलासा

-पवारसाहेबांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आणि हीन दर्जाचा; अमोल कोल्हे संतापले

-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर शिवजयंतीच्या तारखेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

-केजरीवालांचा ‘झाडू’ पुन्हा भाजपचा सुफडासाफ करणार; सर्व्हेचा अंदाज

-चाकणकर ही बावळट बाई; चित्रा वाघ यांना संताप अनावर