‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना केल्याबद्दल उदयनराजेंनी केलं पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक

सातारा | अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्रस्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली. यावर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल. या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे तसेच पंतप्रधान यांचे मनापासून अभिनंदन, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं कर्तव्यच होतं. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना देण्यात आली आहे. यानंतर आज लोकसभेत नरेंद्र मोदींनी राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-ठाकरे सरकारने केलेली 2 लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी; मंत्री बच्चू कडू यांचं वक्तव्य

-देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार??; चंद्रकांत पाटील यांचा मोठा खुलासा

-पवारसाहेबांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आणि हीन दर्जाचा; अमोल कोल्हे संतापले

-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर शिवजयंतीच्या तारखेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

-केजरीवालांचा ‘झाडू’ पुन्हा भाजपचा सुफडासाफ करणार; सर्व्हेचा अंदाज