“अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजा त्यांच्याकडून रूम भाडं घेऊ नका”

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुण्यातील घरमालकांना एक विनंती केली आहे.

पुण्यात स्पर्धा परिक्षा करण्यासाठी आलेले सर्व विद्यार्थी हे जवळपास शेतकरी कुटुंबातील असून कोरोनाच्या संकटामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे या अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजून त्यांच्याकडून रूम भाडं घेऊ नये, अशी विनंती बच्चू कडू यांनी पुण्यातील घरमालकांना केली आहे.

आजवर याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला साथ दिली आहे. आता अडचणीच्या काळात त्यांना सहकार्य करण्याची वेळ आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या अडचणीच्या काळात आपण विद्यार्थ्यांकडून निदान 3 महिने रूम भाडं घेऊ नये, अशी विनंती बच्चू आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

-लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण….

-कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील

-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत

-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबे