लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण….

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र असं असतानाच केरळातील कोझीकोडे येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.

एक प्रेमी युगुल लॉकडाउनच्या काळातच लग्न करण्यासाठी घरातून पळून गेलं. मात्र त्यानंतर त्यांच्यावर पळून जाण्याऐवजी लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

21 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षाचा मुलगा लॉकडाउनच्या कालावधीत घरातून पळून गेले. मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीच्या घरुन लग्नाला विरोध होता. मुलगी घरातून पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु करण्याआधीच हे दोघे पोलीस स्थानकात हजर झाले. पोलिसांनी या दोघांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. यावेळी मुलीने मी 21 वर्षांची असून माझ्या इच्छेनेच मुलाबरोबर पळून गेल्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायलयाने या दोघांना पळून जाण्याच्या गुन्ह्यामधून मुक्त केलं.

महत्वाच्या बातम्या 

-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता

-कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील

-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत

-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबे